पुणे : टेम्पोच्या समोरील काचेवर अत्यावश्यक सेवा असे स्टिकर लावून प्राण्यांसाठी चारा वाहतुकीच्या नावे गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. बीटी कवडे रोड भागात कारवाई करून ६७५ लिटर गावठी दारू, २६ रिकामे कॅन असा १ लाख २८ हजारांचा दारू साठा आणि वाहतुक करणारा ६ लाखांचा टेम्पो आदी मुद्देमाल जप्त केला.
चंदू आनंद सासणे (रा. घोरपडी गाव) आणि त्याचा हस्तक लियाकत अब्बास (शेख वय ३२, रा. बालाजी नगर) यांनासुद्धा सदर ठिकाणी रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. त्यांच्याविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत बी.टी कवडे रोड येथील कृष्णा नगर मधील चंदू आनंद सासणे याचे दारूचे अड्ड्यावर पाळत ठेवून पांढऱ्या रंगाचा टेम्पो मधून गावठी बनावटीची दारूचे भरलेले २५ कॅन प्रत्येकी ३५ लिटर असा, एकूण सव्वा लाख रुपयांची एकूण ६७५ लिटर गावठी दारू आणि अडीच हजार रुपयांचे २६ रिकामे कॅन असा ऐवज आढळून आला.
अप्पर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग व सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड कर्मचारी पो. हवा. संदीप साबळे, अमोल पिलाणे, उदय काळभोर. यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे
प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे