आंबेगाव : हिंदू-मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब देवाची यात्रा (ऊरुस) मंगळवार (दिः१७) ते गुरुवार (दिः१९) अशी तीन दिवस भरणार होती. पण पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरस संसर्ग होऊ नये तसेच त्याचा फैलाव होऊ नये म्हणून वडगावपीर व मांदळेवाडी ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी माहिती माजी सरपंच संजय पोखरकर यांनी दिली आहे. या संदर्भात आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावच्या ग्रामस्थांची बैठक वडगावपीर येथे शुक्रवार ( दिः.१३) रोजी आयोजित केली होती. यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कृष्णकांत खराडे, वडगावपीरच्या सरपंच मिरा पोखरकर, मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक, हजरत दावल मलिक पीरदर्गा शरीफ ट्रस्टचे अध्यक्ष हनिफ मुजावर, उपसरपंच रविंद्र गुळवे, माजी सरपंच जायदाबी मुजावर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सावळेराम आदक, चेअरमन शांताराम सुर्यवंशी, ग्रामसेविक मनिषा वळसे-काळे व मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिकांनी व बाहेरील भाविक भक्तांनी यात्रा रद्द झाल्यामूळे यात्रेसाठी येऊ नये असे अवहान करण्यात आले व याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे माजी सरपंच संजय पोखरकर यांनी सांगितले.