महाफीड कंपनीकडून देवपिंपळगाव शाळेस एक लाखाचे शैक्षणिक साहित्य भेट

बदनापूर, जालना १८ मार्च २०२४ : व्यावसायिक व सामाजिक जवाबदारी म्हणून महाफीड स्पेशॅलिस्ट फर्टिलायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे शाखा, जालना या कंपनीकडून बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव जिल्हा परिषद शाळेस एक लाख रु किमतीचे साहित्य भेट देण्यात आले. ज्यामध्ये २ ऑफिस कपाट, १ ग्रंथालय कपाट, प्रत्येक वर्गासाठी १ या प्रमाणे ८ वर्गासाठी ८ छोटे कपाट, ५ टी.व्ही.संच असे साहित्य भेट देण्यात आले आहे.

शाळेच्या या कार्यक्रमात कंपनीचे विभागीय एरिया मॅनेजर रामेश्वर शेजूळ यांनी वरील प्रमाणे साहित्य शाळेला सुपूर्द केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नानाभाऊ नन्नवरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर शेजूळ, श्री.मनिष पित्ती , सुरेश एखंडे, शिवाजी चव्हाण, उद्धव नन्नवरे, केंद्रप्रमुख अन्नासाहेब खिल्लारे हे होते. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित तुकाराम नन्नवरे ,ज्ञानेश्वर माऊली,उद्धव नन्नवरे, उपसरपंच गोविंद नन्नवरे, अंबादास जाधव, डॉ .नानासाहेब जाधव, श्रीमंत पठारे, बिबिशन नन्नवरे, साईनाथ गव्हाड, जीवन आठवले, शालेय व्य.समिती अध्यक्ष गणेशराव जाधव, उपाध्यक्ष बंडू पठारे, लिंबाजी येवले यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रभाकर चव्हाण यांनी केले तर डॉ.नानासाहेब जाधव यांनी आभार व्यक्त केले

न्युज अनकट प्रतिनिधी : आदिल खान

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा