नाशिक, १० सप्टेंबर २०२१ : नांदगाव तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या अतीव पावसामुळे नद्या नाल्यांना महापूराचे स्वरूप प्राप्त झाले होते. नायडोंगरी गट परिसरातील भागात ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतीमध्ये पाणी जाऊन उभ्या पिकांचं व पशुधनासह शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. विशेषतः पिंपरी हवेली, हिंगणे देहरे परधडी, नायडोंगरी परिसर गावाची परिस्थिती खूपच वाईट आहे, गेल्या काही काळात जेवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं नुकसान आजच्याघडीला आलेल्या पुरामुळे झाल असून झालेल्या अतिवृष्टीमुळे आज नुकसानाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती पाहण्यासाठी , मा.आमदार सुहास अण्णासाहेब कांदे यांनी भेट दिली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच प्रशासन कडून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन व अधिकाऱ्याशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी, मा.आमदार सुहास अण्णासाहेब कांदे यांनी आपण पाठपुरावा करणार असल्याचे गावातील नागरिकांना आश्वासन दिले यावेळी सोबत मा.सभापती विलासभाऊ आहेर, गुलाबभाऊ भाबड, शिवसेना तालुका प्रमुख किरणभाऊ देवरे, तेजराज आहेर, सुपडू साळुंके, सीताराम राठोड,योगेश वाघ, संदेश आहेर,ऋषिकेश पाटील,अमोल मोरे, सरपंच अनिल वाघ व पिंपरी हवेली, हिंगणे देहरे व नायडोंगरी परिसरातील शेतकरी, उपस्थित होते.
गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नांदगाव तालुक्यात आलेल्या पुरा मुळे सर्व पिके पाण्याखाली, शेतकऱ्यांवर पुराचा मार