नवी दिल्ली, २ जुलै २०२१: इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian medical association) आणि रामदेव बाबा यांच्यातील वाद मागील काही दिवसात चांगलाच चर्चेत राहिला होता. मात्र डॉक्टर्स डे च्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएमए’लाच योगावर संशोधन करण्याचा सल्ला दिलाय. डॉक्टर्स डे च्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी आयएमए’ला डॉक्टरांना योगा वर अभ्यास करण्याचं आव्हान केलंय. मोदी म्हणाले की, “जर डॉक्टरांनी या विषयावर अभ्यास करण्यास सुरुवात केली तर लोकांचा योगाकडं बघण्याचा दृष्टीकोन देखील बदलेल. आयएमए अशा संशोधनास मिशन मोडवर पुढं नेहू शकता का? तुम्ही केलेली स्टडी इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध होऊ शकते का.”
पुढं मोदी म्हणाले की, “कोरोनाच्या काळात आज आपल्या हजारो डॉक्टर्स’नी कोविड प्रोटोकॉल्स बनवले आहेत आणि त्यांना लागू देखील केलं जात आहे. आपण सर्वांनी बघितलं की कशाप्रकारे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर ला कमजोर बनवलं जात होतं. असं असताना देखील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती कोरोना च्या बाबतीत चांगली आहे.”
पीएम मोदी म्हणाले की, “मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की, जागरूकतेनं कोरोना प्रोटोकॉलचं अनुसरण केलं पाहिजे. आजकाल वैद्यकीय जगाशी संबंधित लोक योगास प्रोत्साहन देण्यासाठी पुढं येत आहेत.” ते म्हणाले की, बर्याच आधुनिक वैद्यकीय विज्ञान संस्था कोरोनाचा संसर्ग झाल्यावर योगा करून कसे बरे होऊ शकतात याचा अभ्यास करत आहेत. यावेळी डॉक्टरांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या डॉक्टरांच्या ज्ञान आणि अनुभवामुळंच आम्ही कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यात मदत करत आहोत. आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पही सरकारनं दुप्पट केलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे