काही लोक मांसाहार करत नाहीत मात्र अंडी खातात. अशा लोकांसाठी खास अंडा सँडविच!
साहित्य
५-६ उकडलेली अंडी, अर्धी वाटी मेयोनीज / क्रीम चीझ / पनीर किंवा चक्काही चालेल. सलाड पाने, कोबीची पाने, पालक पाने, गाजर, चवीनुसार फ्रेश हब्र्ज, मीठ, मिरपूड, ड्राय हब्र्ज, लिंबू रस, चिली फ्लेक्स, कोणताही सँडविच ब्रेड.
कृती-
उकडलेल्या अंडय़ांचे तुकडे करून घ्या. पनीरही चांगले कुस्करून घ्या. पालकाची पाने, सलाडची पाने किंवा कोबीची पाने यांतील जे असेल ते तुम्ही वापरू शकता. ही पाने जाडसर चिरून घ्या. गाजर किसून घ्या. आता ब्रेड सोडून सर्व पदार्थ एकत्र करा.आणि हे मिश्रण ब्रेडमध्ये भरा आणि खरपूस भाजा. मस्तपैकी सँडविच तयार!