भगरीचा शिऱ्याने करा उपवासाचा खास

उपवासाला काही गोड त्यातल्यात्यात शिराच खायचा असेल तर आम्ही तुम्हाला भगरीचा शिरा शिकवणार आहोत. नक्की करा आणि चाखून पहा:
साहित्य – 1 वाटी भगर, 2 वाट्या पाणी, अर्धी वाटी दुध, पाऊण वाटी साखर , 1 चिमुट मीठ, 2 चमचे तूप, 3-4 वेलच्या, 7-8 बेदाणे आणि केशर.
कृती –
▪ दुध आणि पाणी एकत्र करून गरम करत ठेवावे. त्यात केशर घालावे. कढईत तूप तापल्यावर कोरडे भगर घालून गुलाबी रंगावर परतावे.
▪ त्यात एकत्र केलेले उकळते दुध व पाणी ओतावे. झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे.
▪ पाणी सुकल्यावर त्यात साखर, मीठ, वेलची पावडर , बेदाणे (सुकामेवा आवडीनुसार घालू शकता) घालून चांगले परतावे. परत झाकण ठेऊन 3-4 मिनिटे शिजू द्यावे. मग गॅस बंद करावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा