गोल पोस्ट राजकारण एकनाथ खडसे लिहिणार आत्मचरित्र

एकनाथ खडसे लिहिणार आत्मचरित्र

जळगाव २८ ऑक्टों: गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये एकटे पडलेले नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमध्ये त्यांना फारशी किंमत मिळत नसल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले.
विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगी रोहिणी हिचा पराभव झाल्यामुळे ते दुखावले गेले आहेत आणि जास्त आक्रमक झाले आहेत. आता आत्मचरित्र लिहून अनेक स्पोर्ट माहिती बाहेर आणण्याचे ते म्हटले आहेत. गेल्या चाळीस वर्षांचा मोठा अनुभव ते आपल्या आत्मचरित्रातून मांडणार आहेत असे ते म्हणाले. राजकारणातील अनेक गौप्यस्फोट ते आपल्या चरित्रातून सांगणार आहेत असेही ते म्हणाले. अनेक वर्षापासून त्यांचे राजकारणात असलेली कारकिर्दी मुळे ज्या गोष्टी जगाला माहित नाही या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे असे बोलत जगासमोर या सर्व गोष्टी आणण्याचा इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!
Exit mobile version