गोल पोस्ट स्पॉटलाइट एकता कपूरच्या प्रतिमेला सैनिकांनी मारले जोडे

एकता कपूरच्या प्रतिमेला सैनिकांनी मारले जोडे

श्रीगोंदा, दि. २८ जून २०२० : देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या पत्नी विषयी अपशब्द वापरणा-या चित्रपट व टेलिविजन निर्माती एकता कपूर हिच्या विरोधात दिनांक २७ जून रोजी त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने अंदोलन करण्यात आले.

या वेळी जोडे मारून आजी माजी सैनिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. चित्रपट व टेलिविजन निर्माती एकता कपूर यांनी देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या पत्नी विषयी अपशब्द वापरले यामुळे संतप्त झालेल्या क्रिओल आजी माजी संघटना श्रीगोंदा येथील सैनिक आणि नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी त्यांनी अप्पर जिल्हा अधिकारी चारूशीला पवार यांना निवेदन देखील दिले. या निवेदनात त्यांनी म्हटल आहे की एकता कपूर यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार देखील काढून घ्यावा, अशी मागणी करत नंतर आंदोलकांनी तीच्या फोटोला जोडे मारले. एकता कपूर यांचा तीव्र शब्दात निषेध केला. एकता कपूर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version