कमलनाथनंतर भाजपा उमेदवार इम्रती देवी यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

मध्य प्रदेश, १ नोव्हेंबर २०२०: मध्य प्रदेशात ३ नोव्हेंबरला २८ जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं मंत्री आणि भाजपा उमेदवार इमरती देवी यांना प्रचारासाठी बंदी घातली आहे. आज इम्रती देवी यांना प्रचार करता येणार नाही. वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल इम्रती देवी यांना राज्यात १ नोव्हेंबर रोजी कोठेही जाहीर सभा, मिरवणुका, मोर्चे, रोड शो आणि मीडिया मुलाखतींमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे.

घटनेच्या कलम ३२४ अन्वये मिळालेल्या अधिकारांच्या आधारे निवडणूक आयोगानं भाजपा उमेदवार इम्रती देवी यांना मध्य प्रदेशात कोठेही कोणत्याही प्रकारच्या जाहीर सभा, मिरवणुका, रॅली, रोड शो आणि माध्यमांच्या मुलाखतीं वर बंदीचं जाहीर निवेदन दिलं.

वास्तविक, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमर्तीदेवी यांच्याबाबत रॅलीमध्ये आयटमसारखे शब्द वापरत भाष्य केलं. सूड म्हणून इम्रती देवींनीही कमलनाथविरोधात वक्तव्य केलं, इतकंच नव्हे तर इम्रती देवींनी कमलनाथ यांच्या कुटुंबातील महिलांनाही या वादामध्ये ओढलं. त्यावर निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर देताना इम्रती देवी यांनी हे आरोप फेटाळून लावले. परंतु आयोगानं त्यांच्यावर कारवाई केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा