पुणे:१ सप्टेंबर २०२२. बिबवेवाडी परिसरातील वरद भोकरे या अकरा वर्षीय स्केटिंगपटूने कर्नाटकमधील शिवगंगा आंतरराष्ट्रीय रिंग बेळगाव संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये सलग १६ तास स्केटिंग करून एक जागतिक विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये झाली असून, त्याबाबतचे पत्रही नुकतेच मिळाले.
पुणे शहरातील हीचींग इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या वरद याने रॉक ऑन व्हील अकादमीच्या वतीने स्केटिंग चा सराव केला होता. या अकादमीच्या वतीने पुणे शहरातून एकूण २६ बाल स्केटिंगपटू कर्नाटकमधील शिवगंगा आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंग बेळगाव येते गेले होते. त्या ठिकाणी संपूर्ण देशभरातून विद्यार्थि आले होते.
अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा मध्ये नेपुण्य मिळून नवनवीन विक्रमाच्या नोंदी केल्या आहेत. त्यातच बिबवेवाडी परिसरातील वरद याने स्केटिंगच्या क्रीडा स्पर्धेत सलग खेळ सादर करून नवा विश्वविक्रम केल्याबद्दल त्याचे, त्याच्या शिक्षकांचे, आई – वडिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सुरज गायकवाड.