एलॉन मस्क पुन्हा चर्चेत

वॉशिंग्टन, २७ ऑक्टोंबर २०२२: टेस्ला मोटर्सचे सीईओ एलॉन मस्क सध्या ट्विटर डिलमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसमध्ये पोहचले आहेत. त्यांनी केलेली अनोखी एन्ट्री पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दोघांमधील विक्रीचा करार फिस्कटला आणि प्रकरण थेट न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयानं शुक्रवारपर्यंत ४४ बिलियन डॉलर्सची ही डील पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या मुदतीच्या दोन दिवस आधीच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर बायोमध्येही काही बदल केले आहेत. मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन ‘ट्विटर हेडक्वॉर्टर’ असं अपडेट केलं. त्यापाठोपाठच त्यांनी डिसक्रिप्टर ‘चीफ ट्वीट अस केल आहे.
त्यानंतर एलन मस्क यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. मस्क ट्विटरच्या कार्यालयात गेले खरे, पण ते रिकाम्या हातांनी नाही, तर एक बेसीन सिंक घेऊन पोहोचले.

एलॉन मस्क यांनी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. पण, नंतर एलॉन मस्क ४४ बिलियन डॉलरची ट्विटर डील रद्द करण्याच्या तयारीत होते.

पण, आता ही डील पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. याच डीलसाठी ते ट्विटरच्या हेड क्वॉर्टरमध्ये गेले होते. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा