एरंडोल येथे झालेल्या भीषण अपघातात सातजण जागीच ठार

30

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने प्रवासी काळ्यापिवळ्या गाडीला धडक धडक दिली. या अपघातात काळ्यापिवळ्या गाडी चालकासह गाडीत असणाऱ्या अन्य सहा प्रवाशांचा देखील यात जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे शहराकडून जळगावच्या मार्गाला एक मालवाहू ट्रक (एम एच १५ जी ८४७४) धावत होता. दरम्यान, एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी जळगावकडून एरंडोलच्या दिशेला सहा प्रवाशांनी भरलेली एक काळी पिवळी गाडी जात होती. गाडी क्र. एमएच १९ वाय ५२०७ असे होते. मालवाहू ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ती काळ्यापिवळ्या गाडीवर आदळली. या भीषण अपघातात काळ्या पिवळ्या गाडीच्या चालकासह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा