परीक्षेची तारीख ठरली

नुकतचं परीक्षा ॲानलाईन घ्या असं म्हणून विद्यार्थ्यांना चिंथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ ला नुकतचं अटक करण्यात आलं . पण त्यामुळे सुरु झालेल्या वादाला अखेर पूर्ण विराम मिळाला. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ॲानलाईन होणार की ॲाफलाईन यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ॲाफलाईन होणार हे जाहीर केलं आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा ४ ते ३० मार्च , दहावी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होणार आहे. शाळा तिथे परिक्षा या तत्वानुसार ही परींक्षा होणार असून शाळेतले शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना लसीकरणाचे बंधन नाही. मात्र एका वर्गात केवळ २५ विद्यार्थी बसणार असून झिग-झॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहे. शाळेतल्या कॅापी रोखण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते ४ मार्च या काळात होणार आहे तर बारावीची परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या काळात होणार आहे.
तब्बल दोन वर्षानंतर अखेर दहावी आणि बारावी परीक्षा ॲाफलाईन होणार आहे. त्यामुळे निकाल काय लागणार , हे पाहणं उचित ठरेल. मात्र विद्यार्थ्यांची मानसिकता आम्हाला माहित असून पालकांनीदेखील ॲाफलाईन परीक्षेला संमती दिली आहे. असं मत वर्षा गायकवाडांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केलं. त्यामुळं अखेर ॲाफलाईन की ॲानलाईन परीक्षा या प्रश्नावर पडदा पाडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा