सातारा, २७ फेब्रुवारी २०२४ : जालन्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी, आकोला देव येथे काल अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल सायंकाळच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि तुफान गारपीटीला सुरुवात झाली. सुमारे २० मिनिटे झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकृपा केली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावला घेतला असून शेती पीक आणि फळबागांचे यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारने लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेती पीक आणि फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी