शेतकरी- नेते- आंदोलन आणि काय..

लखीमपूर ; 5 ऑक्टोंबर 2021;उत्तरप्रदेशातलं एक गाव.. केवळ एका गोंधळामुळे चर्चेत आलं. याच लखीमुपूरमध्ये हिंचासार झाला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. एवढ्यावरच ही चर्चा थांबली नाही. तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लखीमपूरला गेल्या आणि त्यांना तिथे गावात पाय ठेवण्यापासून अडवलं. त्यांना अटक करण्यात आलं आणि लखीमपूरचं नाव राजकारणात आलं. केंद्रीय गृहमंत्र्याच्या मुलांने शेतक-यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आंदोलक शेतक-यांनी केला. हे प्रकरण नक्की काय आहे आणि कुठून सुरु झालं,याचा अंदाज आता यायला लागला आहे.

“सुधर जाओ वरना दों मिनिट लगेंगे” अशा प्रकारचे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजप खासदार अजय मिश्रा यांनी शेतकरी आंदोलकांविषयी केले. त्याचेच पडसाद त्यांचा कार्यक्रम जेव्हा लखीमपूर मध्ये होणार होता, तेव्हा उमटले. तिथून सुरुवात झाली निदर्शनाला. कार्यक्रमाहून जाताना हेच मंत्री खाली अंगठा दाखवत आंदोलकांना खिजवताना दिसले. मात्र हे झाल्यानंतर त्यांनी सगळे आरोप नाकारले. आपल्या मुलांनं काही केलं नसून तो घटनास्थळावर उपस्थित नव्हता, असं त्यांनी माध्यामांना सांगितलं.

खरं तर कुस्तीच्या कार्यक्रमासाठी केशव मोर्य येणार होते. मात्र त्यांच्याबरोबर येणा-य अजय मिश्रा यांना शेतक-यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे तिथूनच थोडीफार अस्थिर स्थिती निर्माण झाली होती. त्यांनी हेलिकॉप्टर न उतरवून देण्याचा इशारा दिला. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आठ शेतक-यांवर गाडी घालून दहा दिवसांच्या आगीत निखारा टाकला आणि अखेर भडका उडाला. मौर्य यांनी कार्यक्रम रद्द केला पण त्याचे पडसाद उमटले गेले ते कायमचेच.

यावर राजकारणातून प्रतिक्रिया आल्या. संजय राऊत यांनी हा सर्व प्रकार लांच्छनास्पद असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आपली बाजू मांडण्यासाठीच आले होते असं सांगितलं. यावेळी सपा, बसपा आणि आपच्या नेत्यांनादेखील पोलिसांनी लखीमपूरमध्ये अडवलं. तर प्रियांका गांधी यांनाही त्यांनी अडवलं. एवढ्यावरच न थांबता मध्यरात्री त्यांना अटकही केलं. मुलांमुळे वडिलांचे नाव खराब होण्याचा सिलसिला सुरुच झाला आहे. आधी आर्यन खानमुळे तर आता अशिष मिश्रामुळे वडिलांचे नाव खराब झाले आहे.

पण या सगळ्यात एका गोष्टीचा विचार प्रामुख्याने येत आहे की, केंद्र सरकार याकडे का गांभिर्याने लक्ष घालत नाही. भाजपच्या नेत्यांची मुजोरी सुरु राहून नाव खराब करत का विरोधी पक्षाला बोलण्याची संधी मिळावी, याचा विचार भाजप करत नसल्याचं प्रामुख्याने जाणवतं आहे. याचा केंद्र सरकारने नक्कीच निवडणुकीच्या तोंडावर विचार करावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस, लखीमपूर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा