फास्टॅग नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

इंदापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक केले आहे. त्यासाठी वाहनचालकांना वेळोवेळी तसे सूचित करण्यात आले होते. मात्र वाहनचालकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.
इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल प्लाझाजवळ सकाळच्या सुमारास फास्टॅग नसल्यामुळे वाहनांच्या तब्बल दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
ज्या वाहनांना फास्टर नाही अशा वाहनचालकांकडून टोल प्रशासनाकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येत असल्याचे समजले. ज्या वाहनांना फास्टॅग असून देखील वाहतूक कोंडीत अडकण्याची फास्टॅग धारक वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत महामार्ग रस्ता सुरक्षा दलाचे प्रमुख नवनाथ फराटे त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी वाहनचालकांनी आपल्या वाहनाला फास्टॅग लावून टोल प्रशासनाला सहकार्य करावे आणि वाहतुकीची शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा