टोकियो, जपान १७ जून २०२० : ऑलंपिक स्पर्धा झाल्यातर कम्यूनिटी स्प्रेडमुळे कोरोनाचा अजून प्रसार होईल याचा विचार करून आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीने (IOC) स्पर्धा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर टोकियो बोर्डाने आंतरराष्ट्रीय समितीला सांगितले की , ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्याने मोठा तोटा होईल, यासाठी एखादा पर्याय पुढे आला पाहिजे . त्यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करणे योग्य होणार नाही असे टोकियो ऑलिम्पिक मंडळाचे सदस्य हर्यूयुकी ताकाहाशी यांनी म्हटले आहे. यामुळे सरकारचे बरेच नुकसान होईल.
मार्चमध्ये टोकियो खेळ आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीने (आयओसी) कोरोनामुळे स्पर्धा एका वर्षासाठी तहकूब केली होती. आता ती २०२१ मध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान असेल. नुकतेच आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की कोरोनामुळे पुढच्या वर्षी ऑलिंपिक खेळ होऊ शकले नाहीत तर ते रद्द केले जाईल. खेळाचा पाठपुरावा करण्याचा कोणताही पर्याय नाही.
जपानच्या डेली निक्कन स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, तकाशाहीने म्हटले आहे की ऑलिम्पिक रद्द झाल्याने जपान आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. ते रद्द झाल्यामुळे बरेच नुकसान होईल. तकशाहीने नुकसानाचे मूल्य सांगितले नाही. तथापि, ऑलिम्पिकच्या एका वर्षामुळे जपानला आधीच ५६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यावर २० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्चही वाढला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी