कुलगाममध्ये महिला शिक्षिकेची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केले ठार

31 मे 2022:जम्मू-कश्मीर; जम्मू-कश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य समोर आले आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली. मृत शिक्षकाचं नाव रजनी असं आहे.

ही घटना कुलगामच्या गोपालपोरा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे दहशतवाद्यांनी गोपालपोरा हायस्कूलच्या शिक्षिका रजनी यांच्यावर गोळीबार केला. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला सांबा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडं सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली.

काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची लवकरच ओळख पटवून त्यांना शिक्षा केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सलग हत्त्यांच्या घटना

25 मे 2022 – कश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.

24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

17 मे 2022- बारामुल्ला येथील वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

12 मे 2022 – कश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.

12 मे 2022- पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

9 मे 2022 – शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले.

2 मार्च 2022- कुलगाममधील सांडू येथे दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा