नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२० : कोरोनाची रुग्ण संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. यातच कितीतरी डॉक्टर्स , वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचारी आणि आपातकालीन सेवा पुरवणारे लोक त्यांच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.
अनेक पोलिस आणि डॉक्टर्स यांनी आपले कर्तव्य बजावताना आपला प्राण गमावला आहे. त्यातच एक घटना दिल्ली मध्ये घडली आहे . आयशा ही नुकतीच डॉक्टर झाली होती. आणि डॉक्टर झाली यामुळे ती खूप आनंदात होती. मात्र कर्तव्य बजावताना तिला कोरोनाची लागण झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले . आणि उपचार करत असताना तिने हसत जगाला निरोप दिला. तिने ईद च्या दिवशी शेवटचा श्वास घेतला. आणि लोकांसाठी एक संदेश आणि एक हास्य सोडून गेली.
आयशाने तिच्या वाढदिवशी एक व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंट वर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओ मध्ये ती खूप आनंदात दिसत होती. १७ जुलै रोजी तिने तिचा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या पीक मध्ये संदेश ही लिहला होता त्यात ती म्हणते – हाय फ्रेंड्स … मी कोरोनाशी नाही लढू शकत. आज मी कोणत्याही क्षणी व्हेंटिलेटर वर जाऊ शकते. मला आठवणीत ठेवा. तुमच्यासाठी माझी स्माइल.. तुमच्या मैत्रीसाठी खूप आभार.. तुमची खूप आठवण येईल.. सुरक्षित रहा.. या जीवघेण्या वायरसला गांभीर्याने घ्या.. सर्वांना प्रेम..बाय…
अमरिंदर नावाच्या एका ट्विटर यूजरने ही माहिती ट्विटर वरून दिली आहे की, “आयशा आत्ताच डॉक्टर झाली होती. १७ जुलैला तिने वाढदिवस साजरा केला”. आपण आयुष्याच्या शेवटी आहोत. हे माहित असून सुद्धा तिने आनंदात निरोप घेतला खूप धाडस लागते या गोष्टीसाठी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरॆ.