अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना भारी पडलं ‘यूपी टाईप’ वक्तव्य, हा राज्यातील जनतेचा अपमान- काँग्रेस

9

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या ‘यूपी टाईप’ विधानावरून राजकीय संघर्ष पेटलाय. निवडणुकीच्या मोसमात काँग्रेसने याला मुद्दा बनवण्याची व्यूहरचना सुरू केली आहे. अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियावर सीतारामन यांना घेरण्यास सुरुवात केलीय.

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करून त्यांच्यावर निशाणा साधला. प्रियांका यांनी सीतारमन यांच्या वक्तव्याला यूपीच्या जनतेचा अपमान म्हटलंय. त्या म्हणाल्या की, यूपीच्या लोकांना ‘यूपी टाइप’ असल्याचा अभिमान आहे. आम्हाला यूपीच्या भाषा, बोली, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे. तुम्ही यूपीसाठी बजेट बॅगमध्ये काहीही ठेवलं नाही, हे ठीक आहे. पण यूपीच्या जनतेचा असा अपमान करण्याची काय गरज होती?

प्रियंका गांधींच्या या ट्विटनंतर यूपी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनही अर्थमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं. ट्विटमध्ये लिहिलंय की, आम्ही यूपीच्या लोकांना “यूपी टाइप” असल्याचा अभिमान आहे. काँग्रेसने यासाठी #UP_मेरा_अभिमान हॅशटॅगही सुरू केलाय. निर्मला सीतारामन यांनी आपल्या लज्जास्पद वक्तव्याने केवळ उत्तर प्रदेशच्या बौद्धिक इतिहासाचा आणि चेतनेचाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनतेचा अपमान केलाय, असं यूपी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलंय. या अपमानाचा बदला यूपीची जनता नक्कीच घेईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण

अर्थसंकल्पावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारचे बजेट शून्यासारखे आहे. यात पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब आणि दलित, तरुण, शेतकरी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी काहीही नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना उत्तर देण्यास सांगितलं असता त्यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना उत्तर देण्यास सांगितले. त्यावर चौधरी म्हणाले की, राहुल गांधींना बजेट समजलंच नाही. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत.

मंत्री पंकज चौधरी यांचा मुद्दा पुढं करत अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, ‘चौधरींनी टिपिकल यूपी टाईप उत्तर दिलं आहे. यूपीतून पळून गेलेल्या खासदारासाठी (राहुल गांधी) हे पुरेसे आहे असे मला वाटते. त्या पुढौ म्हणाल्या की, राहुल यांनी ज्या श्रेणीचा उल्लेख केला आहे. मी अर्थसंकल्पात त्यांच्याबद्दल काही बोलले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा