हिंगणा एमआयडीसी मध्ये अग्नितांडव, स्पेस वूड कंपनीला आग…

नागपुर, ३० डिसेंबर २०२०: नागपुर मधील हिंगणा एमआयडीसी मधील एका फर्निचर कंपनीला काल दुपारी चारच्या सुमारास मोठी आग लागली. पाहता पाहता ही आग कारखान्याच्या अनेक शेड्स मध्ये पसरली. घटना घडल्यापासून रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दल प्रयत्न करीत होते. नागपूर सह संपूर्ण विदर्भामध्ये या कंपनीचे फर्निचर पाठविली जाते. स्पेस वूड असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या आवारामध्ये लाकूड व भुसा मोठ्या प्रमाणावर पडलेले होते. त्यातूनच ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली.

ज्या भागात ही लाकडं व भुसा ठेवण्यात आला होता ती संपूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे त्या भागातील आग विझवण्यात यश आले आहे. मात्र, कंपनीच्या आजूबाजूला जे शेड्स आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर आग कायम होती. या भागातील आग रात्री उशिरापर्यंत वीजविण्याचे प्रयत्न सुरू होते. ही आग एवढी प्रचंड होती की लोखंडी शेड आणि पत्रे देखील खाली कोसळले आहेत.

असे सांगितले जात आहे की, फर्निचर बनवण्यासाठी जे केमिकल सामग्री लागते ज्यामध्ये थिनर, पेंन्ट, फेविकॉल यांना आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. या आगीमुळे कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा