चंडीगढ़, १४ जून २०२१: दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. निर्मल मिल्खा सिंग ८५ वर्षांच्या होत्या. त्या पंजाब सरकारमधील क्रीडा (महिला) संचालक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. पती मिल्खा सिंग रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही.
निर्मल मिल्खा यांच्या निधनाबद्दल माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले की, ‘कोविदमुळे निर्मल मिल्खा सिंग यांचे आज सायंकाळी चार वाजता निधन झाले आहे याबद्दल सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे.’
परिवाराने सांगितले की पंजाब सरकारमधील महिला क्रीडा संचालक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघा च्या माजी कर्णधार निर्मल जी शेवटपर्यंत कोरोनाविरूद्ध धैर्याने लढल्या. त्या मिल्खा कुटुंबाच्या कणा होत्या.
त्यांच्या कुटुंबीयांकडून असे सांगितले गेले की, ‘फ्लाइंग शीख’ मिल्खासिंग आजही आयसीयूमध्येच असल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहू शकले नाहीत याची खंत आहे. या कठीण परिस्थिती दरम्यान एकता आणि प्रार्थना केल्याबद्दल कुटुंबाने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे, ज्यामुळे त्यांना या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची शक्ती मिळाली.
निर्मल मिल्खा यांचा जन्म पाकिस्तानच्या शेखपुरा येथे ८ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला होता. त्या तीन स्वतंत्र प्रसंगी पंजाब व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या. १९५५ मध्ये भारत व्हॉलीबॉल संघाचा भाग म्हणून त्यांनी श्रीलंकेला भेट दिली होती तिथे मिल्खासिंग यांची भेट झाली. त्यानंतर दोघांचे १९६२ मध्ये लग्न झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा जीव मिल्खा आणि एक मुलगी आहे. मुलगी मोना मिल्खा सिंह न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
