कोरोना व्हायरसमुळे शिर्डीत स्वच्छता

शिर्डी : शिर्डीतील साई संस्थान आणि नगरपंचायतीकडून स्वच्छता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. शिर्डीमध्ये दररोज हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी साई संस्थानकडून वेळोवेळी ओल्या कपड्याने मंदिर परिसरात स्वच्छता केली जात आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून मेडिकल टीमसुद्धा सज्ज झाली आहे. शिर्डीत हजारो भक्तांची गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली जात आहे. भाविकांना स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत साई संस्थांन प्रशासनाकडून स्वच्छतेचा वारंवार आढावा घेण्यात येत आहे. अस्वच्छता करू नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. अस्वच्छता करणार्‍यांवर लक्ष ठेवले जात आहे. सर्दी, खोकला, ताप, असे आजार अंगावर न काढता वैद्यकीय उपचार घेण्याचे देखील सुचविले आहे. परराज्यातील, परदेशातून आलेल्या भाविकांची मंदिर परिसरात नेमलेल्या वैद्यकीय पथकाकडून तपासणी होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा