मुंबई, 26 नोव्हेंबर 2021: यंदाचेही हिवाळी अधिवेशन नाशिक ऐवजी मुंबईत घेण्यात येणार आहे. असा तर्क देखील लावला जात होता. कारण जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन संपतानाच हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. यानुसार 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होईल असं ठरलं. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना देखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळं आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचं सावट आणि विधान परिषद निवडणूक हेही कारणं असल्याचं बोललं जातंय.
हिवाळी अधिवेशन गाजणार, नवाब मलिकांचा इशारा
मंत्री नवाब मलिक यांनी आगामी हिवाळी अधिवेशन गाजणार असल्याचं आधीच म्हटलं होतं. सध्या राज्यात मुंबई आर्यन खान ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या दरम्यान भाजपने अनेक आरोप देखील केले. त्यांना प्रत्युत्तर आगामी हिवाळी अधिवेशनात देणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यामध्ये माझ्यावर भाजपाकडून बरेच आरोप आणि हल्लाबोल केला जाईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नावं समोर येणार आहेत, असं मलिक म्हणाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे