ग्रामपंचायतींच्या गाळ्यांचे सहा महिन्यांचे भाडे माफ करा : प्रवीण माने

इंदापूर, दि. २१ मे २०२०: पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना रोजगारास चालना मिळावी तसेच ग्रामपंचायतींचे स्वउत्पन्न सुरू व्हावे या उद्देशाने गाळे स्थापन केले आहेत. ते व्यापारी गाळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण भाडे तत्वावर चालविण्यासाठी घेऊन आपला व्यवसाय करतात.

परंतू वाढत चाललेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व व्यवसाय बंद असल्याने या गाळेधारक तरुणांच्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ही आर्थिक घडी पुन्हा बसेपर्यंत या सर्व सामान्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने आपण त्यांना मदतीचा हात पुढे करावा.

सर्रासपणे तीन महिने सर्वत्र असलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर, समाजाची आर्थिक घड़ी स्थिरस्थावर होईपर्यंत सर्वच क्षेत्रांतून असे निर्णय घावे लागणार आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या या गाळ्यांचे पुढील सहा महिन्यांचे भाडे आपण माफ करुन गाळेधारक तरुणांना या आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी विनंती माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांचेकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा