भाजपचे माजी मंत्री शिवसेनेच्या वाटेवर

53

मुंबई, ८ ऑक्टोंबर २०२२ : राज्यात सत्तांतर झाल्या नंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप चालू असताना राजकारणात मोठ्या घटनाही घडत आहेत. दरम्यान भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत

भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी आणि काम करण्यास इच्छूक असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास इच्छूक आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि ते शुक्रवारी पुन्हा शिवसेना भवनाल आले होते. तर या विधानानंतर संजय देशमुख हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सत्तांतरा नंतर काही दिवसांत शिवसेनेसाठी दिलासादायक घटना घडत आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तसेच दोन दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील युतीसाठी प्रस्ताव दिला आहे. एकीकडे शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. पण दुसरीकडे आता विनायक राऊत यांच्याकडून संजय देशमुख हे शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला जात आहे. या बाबतीत शिवसेनेसाठी दिलासादायक घटना आहेत. तरी पण देखील शिवसेनेत येणाऱ्यांपेक्षा जाणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे, तर ही गळती रोखण्याचं शिवसेना पक्षासमोर आत्ता एक मोठं आव्हान आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा