वेस्ट बंगाल २१ फेब्रुवारी २०२५ : माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या गाडीला ( गुरुवारी, २० फेब्रुवारी ) रोजी अपघात झाला. या अपघातात तो थोडक्यात बचावला हे नशीबच म्हणाव लागेल . तो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बर्दवानला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात त्यांचा ताफाही त्यांच्यासोबत जात होता. मग अचानक दुर्गापूर एक्सप्रेस वेवर त्यांच्या ताफ्यासमोर एक ट्रक आला आणि चालकाला अचानक ब्रेक लावावे लागले. या अपघातात ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
अपघात ‘दुर्गापूर एक्सप्रेसवे’वरील दंतनपूर परिसराजवळ झाला. अचानक एक ट्रक ताफ्यासमोर आल्यामुळे चालकाला ब्रेक लावावे लागले असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ताफ्यातील मागच्या गाड्या समोरील गाड्यांवर आदळल्या. या वाहनांमध्ये सौरव गांगुलीची कार देखील समाविष्ट होती. अपघातानंतर, सौरवला सुमारे १० मिनिटे वाट पहावी लागली त्यानंतर तो आणि त्याचा ताफा कार्यक्रमास उपस्थित राहिला.
प्रकृती कशी आहे :
दादपूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत सौरव गांगुली यांच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही. सौरव यांनाही दुखापत झालेली नाही. या धडकेत ताफ्यातील दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले, परंतु संबंधित चालकांना कोणतीही दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरुप आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, ऋतुजा घनवट