गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे हृदविकाराच्या झटक्यामुळे निधन

कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे हृदविकाराच्या झटक्यामुळे निधन

कल्याण, २३ सप्टेंबर २०२०:कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही खालावली होती. त्यामुळेच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु नियमित उपचार घेतल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

राजेंद्र देवळेकर हे त्यांच्या मतदार संघामध्ये गाजलेले व्यक्तिमत्व होते. ते सलग चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तसेच त्यांची ओळख सांगायचं झालं तर संघटनेसाठी कायम झटणारे नेते, मनमिळावू आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात असत. त्यांची महापौर पदासाठी निवड ही २०१५ साली करण्यात आली होती.अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामं मार्ग लावली.

पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं.त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधानाचं वृत्त समजताच सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version