माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

5

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२०: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी दुपारी ट्वीट करून ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “यावेळेस माझे रूग्णालयाला भेट देण्याचे कारण वेगळे आहे ते असे की मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे”.

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची चाचणी घेण्यात यावी, तसेच त्यांना अलगीकरण कक्षामध्ये देखील ठेवण्यात यावे”.

प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच पूर्ण देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी देखील त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील प्रणव मुखर्जी यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी ट्विट केले आहे व त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी देखील त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

प्रणव मुखर्जी यांचे वय ८४ वर्षे आहे, वय वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे २०१२  ते  २०१७ दरम्यान देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. २०१९ मध्ये केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा