गड किल्ले इतिहासाची साक्ष देतात: माजी सभापती प्रवीण माने

6

इंदापूर, २२ नोव्हेंबर २०२०: दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यंदाच्या दिवाळीला, जगावर असणाऱ्या कोरोना सारख्या महामारीचं ग्रहण नक्कीच लागलं, पण तरीही आपली परंपरा जपत इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे, दीपावलीच्या निमित्तानं, पारंपरिक पद्धतीनं किल्ला बनविण्यात आला.

वालचंदनगर याठिकाणी भेट देत, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती माजी सभापती प्रविण माने यांनी किल्ला किंग संघाच्या वतीनं साकारलेल्या किल्ल्याची पाहणी केली. ‘किल्ला किंग’ या संघाच्या लहानग्यांनी शिवरायांच्या आरमाराचा एक बेलाख किल्ला म्हणजे सुवर्णदुर्गाची प्रतिकृती साकारली.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतून पुढं जात समुद्रावरील शिवाजी असं ज्यांना संबोधले जायचे ते कान्होजी आंग्रे व त्यांच्या पुढील पिढ्यांनी मराठयांचं हे आरमार केवळ सांभाळलंच नाहीतर दर्यावर हुकूमतच गाजवली.

वालचंदनगर येथील लहानग्यांनी साकारलेली सुवर्णदुर्गाची प्रतिकृती पाहताना अगदी हरपून गेलो होतो असं मत माने यांनी व्यक्त केलं. याचसोबत
किल्ला पाहत असतानाच किल्ल्याची इत्यंभूत भौगोलिक व ऐतिहासिक माहीती येथील स्वयंसेवकांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

वालचंदनगर येथे साकारलेल्या किल्ल्याची बनावट पाहून किल्ला किंग या संघाला दहा हजार रुपयांचं बक्षीस यावेळी माने यांच्या वतीनं देण्यात आलं. तर आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी तालुक्यातील नवी पिढी समर्थ असल्याचं पाहून समाधान वाटल्याचं मनोगत प्रविण माने यांनी व्यक्त केलं.

याप्रसंगी माझ्यासह राजेश जामदार, बाळासाहेब गायकवाड , संतोष क्षीरसागर, नितीन बनसोडे, जितेंद्र दुरुतकर, विजय कांबळे, अमरिश कंदले, फारूक बागवान, स्वप्नील कंदले, अतुल आंधळे, पिनल दंगाने, सिद्धांत लोंढे, अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा