आजपासून एसटी धावणार पूर्ण क्षमतेनं, या असतील अटी

पुणे, १८ सप्टेंबर २०२०: २० ऑगस्टपासून राज्य सरकारनं एसटी चालवण्यासाठी परवानगीही दिली होती. याआधी लॉकडाउन काळामध्ये एसटी केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वापरली जात होती. मात्र, प्रवाशांच्या मागणीमुळं आणि एसटीचं आर्थिक संकट पाहता शासनानं ही परवानगी दिली होती. असं असलं तरी केवळ ५० टक्के मर्यादेनंच प्रवाशांना एसटीत बसण्याची परवानगी होती, जी आता राज्य सरकारनं वाढवलीय. म्हणजेच आता एसटीमध्ये पूर्णक्षमतेनं प्रवासी प्रवास करण्यास मान्यता मिळालीय.

असूनआजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यावेळी प्रत्येकानं मास्क वापरणं आणि हात निर्जंतुक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एसटी पूर्ण क्षमतेनं धावण्या बाबत एसटीनं राज्य सरकारकड मागणी केली होती. त्यानुसार, राज्य शासनानं प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे, निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पूर्ण आसन क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

सध्या दिवसभरात एसटीच्या सुमारे ५ हजार बसेस राज्यभरात धावत असून या बसेसद्वारे सरासरी ५ ते ६ लाख प्रवाशांची वाहतूक केली जातेय. पूर्ण आसन क्षमतेनं प्रवासी वाहतूक सुरु झाल्यास, भविष्यात कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणं शक्य होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा