गॅलेक्सी M52 5G भारतात लॉन्च,जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

पुणे, 29 सप्टेंबर 2021: दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंग ने भारतात गॅलेक्सी M52 5G लाँच केला आहे. हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. गॅलेक्सी M52 5G ब्लॅक आणि ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची विक्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Galaxy M52 5G ची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. टॉप व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आहे आणि त्याची किंमत 31,999 रुपये आहे. गॅलेक्सी M52 5G सह काही लॉन्च ऑफर देखील उपलब्ध असतील. यामध्ये कॅशबॅकचा समावेश आहे जो HDFC कार्ड द्वारे खरेदी करावा लागेल.

गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7-इंच फुल HD डिस्प्ले आहे. येथे कंपनीचे AMOLED पॅनल आहे आणि आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. गॅलेक्सी M52 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित वन यूआय 3.1 उपलब्ध आहे.

Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सलची आहे, दुसरी 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आलीय. याशिवाय 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आलाय. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये जीपीएस आणि 5 जीसह मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आहे.

गॅलेक्सी M52 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीनं दावा केलाय की हा स्मार्टफोन 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा