गोल पोस्ट राष्ट्रीय जियो घेऊन आले आहे फ्री नेटफ्लीक्स आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग

जियो घेऊन आले आहे फ्री नेटफ्लीक्स आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२०ः ज्या गोष्टीची प्रतीक्षा सर्वच चित्रपटप्रेमी मोठ्या आतुरतेने करत होते. तो क्षण आला आहे. जियोतर्फे पोस्टपेड प्लॅन लाँच करण्यात आला आहे. या नवीन पोस्टपेड प्लॅन मध्ये जियो धारकांना नवीन प्लॅन्स अंतर्गत जियोतर्फे मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आणि मोफत वायफाय कॉलिंग देण्यात आली आहे. 

या प्लॅनमध्ये जियो पोस्टपेड प्लस धारकांना मोफत नेटफ्लिक्स आणि मोफत आंतरराष्ट्रीय कॉलिंग सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनसोबत धारकांना खूप फायदा मिळणार आहे. ३९९ रुपयांपासून सुरु होऊन १४९९ रुपयांपर्यंत हा प्लॅन असणार आहे. या प्लॅनमध्ये धारकांना ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सर्व ऍपच्या सुविधा मिळणार आहेत. ज्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिस्नी + हॉटस्टार यांचा समावेश असणार आहे. 

जियो प्लस प्लॅनच्या माध्यमातून रिलायन्स जियो आपल्या भारतीय ग्राहकांचा अनुभव आणखी चांगला करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि याच उद्देशाने कंपनीने आपला नवीन प्लॅन लाँच केला आहे. याच माध्यमातून कंपनी आपल्या ग्राहकांना आणखी चांगली सर्व्हिस, इंटरनेट आणि अनुभव देणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version