शेअर बाजाराच्या घसरणीसह सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ

मुंबई, २२ डिसेंबर २०२०: जवळपास तीन महिन्यांपर्यंत चढ-उतार झाल्यानंतर गेल्या ५ दिवसांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. सोमवारी जेथे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली त्याचवेळी सोन्याच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ झाली. भारतीय किरकोळ बाजारात सलग ५ व्या दिवशी स्पॉट सोन्या-चांदीच्या भावात वाढ दिसून आली.

राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास सोमवारी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९६ रुपयांनी वाढून ५०,२९७ रुपये झाली. तर मुंबईच्या किरकोळ बाजारात सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम २०० रुपयांनी वाढले आणि त्याची किंमत १० ग्रॅम ५०,३०७ रुपये झाली.

चांदीची किमतीत सोन्यापेक्षा जास्त तेजी असल्याचे दिसून आले. सोमवारी दिल्लीत चांदीचा दर २,२४९ रुपयांनी वाढून ६९,४७७ रुपये प्रति किलो झाला. मुंबईत चांदीचे दर प्रति किलो ६७३ रुपयांनी वाढून ६७,१९२ रुपयांवर गेले.

तज्ज्ञांच्या मते, युरोपमध्ये कोरोना विषाणूची वाढ आणि ब्रिटनमधील कोविडच्या नवीन विषाणूमुळे सोन्या-चांदीत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा