सोलापूर आणि रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार

सोलापूर, १० ऑक्टोबर २०२० : सोलापूर आणि रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बरोबरच विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले.

सामंत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा दौ-यावर होते. सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी आ. प्रणिती शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा