एसबीआय कडून मोठी संधी, स्वस्त दरात विकत घ्या मालमता…

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर २०२०: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला स्वस्त दरात जमीन, घर किंवा दुकानं विकत घ्यायचे असेल तर आपण या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकता. खरं तर, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ३० सप्टेंबर रोजी एक मेगा ई-लिलाव करणार आहे, ज्यामध्ये १००० हून अधिक अचल मालमत्तांचा लिलाव केला जाईल.

बँक त्या संपत्तीचा लिलाव करणार आहे ज्या संपत्तीच्या बदल्यात विविध उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी व लोकांनी कर्ज घेतली होती. अर्थात ही सर्व संपत्ती बँकेकडं गहाण ठेवून घेण्यात आली होती. ही कर्ज फेडण्यास असक्षम झाल्यामुळं आता बँकनं ही संपत्ती विक्रीस काढली आहे. ज्याच्यातून बँक आपली थकबाकी वसूल करेल. या अचल संपत्ती मध्ये फ्लॅट्स, जमीन आणि दुकानं यांचा समावेश आहे.

बँकेच्या म्हणण्यानुसार लिलाव अत्यंत पारदर्शक पद्धतीनं होईल. बँक सर्व संबंधित माहिती प्रदान करेल, बँक संपत्तीशी निगडीत सर्व आवश्यक माहिती जाहीर करेल ज्यामुळं या लिलावात भाग घेणाऱ्यांसाठी संबंधित संपत्ती, दुकान, फ्लॅट, जागा आकर्षक वाटतील. लिलावासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तेचा फ्रीहोल्ड किंवा लीज होल्ड, त्याचं मोजमाप, स्थान आणि इतर माहिती याबद्दलही बँक सांगेल.

एसबीआय’नं आपल्या ट्विटर हँडलवरून या लिलावाची माहिती दिली आहे. याशिवाय लिलावाशी संबंधित माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता. यासाठी बँक शाखेत संबंधित संपर्क उपलब्ध असेल.

ई-लिलावाद्वारे तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया व त्यासंबंधित मालमत्तेची माहिती घेऊ शकता. आपण मालमत्तेची तपासणी देखील करू शकता.

मेगा ई-लिलावात भाग घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी-

ई-लिलावाच्या सूचनेत नमूद केलेल्या विशिष्ट मालमत्तेसाठी ईएमडी (अर्नेस्ट मनी डिपॉझिट).

केवायसी कागदपत्रे: हे संबंधित बँक शाखेत जमा करायचे आहे.

वैध डिजिटल स्वाक्षरीः निविदाकार डिजिटल स्वाक्षरी मिळविण्यासाठी ई-लिलाव किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीशी संपर्क साधू शकतात.

लॉगइन आयडी आणि पासवर्ड: ईएमडी व केवायसी कागदपत्रे संबंधित शाखेत जमा केल्यानंतर ई-लिलाव बिगिनर्सच्या ईमेल आयडीवर लॉगिन आयडी व पासवर्ड पाठवेल.

लिलावाच्या नियमांनुसार बोली लवणाऱ्यांना ई-लिलावाच्या तारखेला लिलाव वेळेत लॉग इन करुन बोली द्यावी लागेल. काही लिंक बँकेच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. मालमत्ता आणि त्यांच्या स्थानाशी संबंधित माहिती यास भेट देऊन मिळू शकेल. याशिवाय ई-लिलावात भाग घेण्याबाबत आणि बिडिंगची माहितीही मिळू शकते. त्यासाठी आपण या लिंकवर क्लिक करू शकताः
https://www.bankeauifications.com/Sbi

ई-प्रोक्यूरमेंट टेक्नोलॉजीज लि.: Https://sbi.auctiontiger.net/EPROC/

प्रॉपर्टी प्रदर्शनासाठी: https://ibapi.in

लिलावाच्या व्यासपीठासाठी: https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा