उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेत दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये मार्गदर्शक तत्व जाहीर

22

दिल्ली, १२ एप्रिल २०२३: राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्ली शहराच्या तापमानात सतत वाढ होत असताना, दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने (डीओई) बुधवारी शहरातील शाळांना उष्णतेशी संबंधित आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “उष्णतेशी संबंधित आजाराची कोणतीही घटना जवळच्या आरोग्य सुविधा/रुग्णालयात नोंदवावी अशी सर्व DDES (शिक्षण जिल्ह्यांचे/झोनचे उपसंचालक) यांना विनंती करण्यात आली.

शिक्षण संचालयाने दिलेले निर्देश-
स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा, दुसऱ्या शिफ्टमध्ये शाळांमध्ये एकत्र येणे टाळणे, वर्गांमध्ये अतिरिक्त पाण्याची सोय आणि विद्यार्थी बाहेर असताना प्रत्यक्ष सूर्यप्रकाश थेट त्यांच्या डोक्यापाशी पोहोचू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे यांचा उपायांमध्ये समावेश आहे.

‘उन्हाळ्याच्या हंगामात दिल्लीचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते आणि ते शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे’, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेदिल्लीमध्ये तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना थकवा, निर्जलीकरण, जुलाब आणि उलट्या यांसारख्या उष्णतेशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये या आजारांचा संसर्ग लगेच पसरू शकतो म्हणून सरकारकडून शाळांच्या प्रमुखांना निर्देश दिले आहेत.दिल्लीमध्ये मंगळवारी ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे. तर काही आठवड्यांमध्येच तापमानाचा हा आकडा ४० अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे