१२ ऑगस्टला होणार “गुंजन सक्‍सेना द कारगिल गर्ल” हा चित्रपट नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित

पुणे, दि. १७ जुलै २०२०: देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने चित्रपटगृहे कधी सुरू होतील हे अद्याप निश्‍चितपणे सांगता येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या संकटकाळात पारंपरिक चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याऐवजी अभिनेत्री जान्हवी कपूर चा “गुंजन सक्‍सेना : द कारगिल गर्ल” हा चित्रपट नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार आहे. १२ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

“गुंजन सक्‍सेना : द कारगिल गर्ल” हा चित्रपट १९९९ च्या कारगिल युद्धात प्रत्यक्ष रणांगणात उतरत निर्णायक भूमिका पार पडणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलट गुंजन सक्‍सेना यांच्या जीवनावर आधारित आहे.

यात जान्हवीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रजा आदी कलाकारांची दमदार फौज आहे. यासोबतच नेटफ्लिक्सवर अन्य बरेच मोठे आणि महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा