फलाहार हा शरीरासाठी चांगलाच असतो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता.
प्रजनन क्षमता वाढते- डाळिंबाच्या रसाने शरिराची प्रजनन क्षमता वाढतेच शिवाय मानवी शरिरात टेस्टोस्टेरोन हार्मोन आणि शुक्राणूंची संख्या वाढवते.
अशक्तपणा दूर होतो- डाळिंबाचा रसात विटामिन आणि अँटी आँक्सिडंटस् खनिजे आहेत जी खनिजे माणसाच्या शरिरातला अशक्तपणा दूर करतो.
रक्ताचा अभाव कमी होतो- डाळिंबाचा रस नियमित घेतल्यास शरिराच्या रक्तात आर्यंन व फोलिक अँसिडचे प्रमाण घटत नाही. सोबतच त्याने आपल्या शरिरातले हिमोग्लोबीन सतत वाढते.
कर्करोगापासून बचाव- डाळिंबाच्या रसात पोलिफेनाँल नावाच्या पेशी असतात. या पेशींमुळे कर्करोगाच्या पेशींचा विकास होणे थांबते आणि आपला बचाव होतो.