डॉक्टरदिनाच्या सर्व डॉक्टरांना न्यूज अनकटतर्फे शुभेच्छा

पुणे १ जुलै २०२१: आज १ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे, कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टरांनी जीवावर उदार होऊन काम केले. त्यामुळे डॉक्टर म्हणजे देवदूत असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याच डॉक्टर दिनाच्या निमित्ताने काही डॉक्टारांची मते न्यूज अनकट ने जाणून घेतल्या.
अखिल जगावर कोविड – १९ या आजाराचे सावट गेले दीड वर्षं पसरलेले आहे. या दरम्यान निर्माण झालेल्या परिस्थिती मधून अनेक व्यावसायिकांचे विविध पैलू पहावयास मिळाले. पोलिस, सफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, बँक्स या सर्व ठिकाणी सेवाभाव आणि सहकार्य यांची अनुभूती मिळाली.
दवाखाने आणि रुग्णालये येथील डॉक्टर, नर्सेस व त्यांचे सहकारी यांच्यासाठी तर गेले १५ महिने युद्ध सदृश परिस्थिती होती. कोविड च्या रुग्णांचे निदान, उपचार, गृह विलगिकरण, अती दक्षता कक्षामधील उपचार, जनजागृती आणि लसीकरण या सर्व आघाड्यांवर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली आहे. औषधे किंवा खाटांची कमतरता, खर्चाची न सुटणारी गणिते, रुग्णांच्या नातेवाईकांची नाराजी, मान्यवरांची दमदाटी व प्रसंगी जबरदस्ती: या सर्व संकटांचा डॉक्टर मंडळी व त्यांचे सहकारी यांनी समर्थपणे सामना केलेला आहे.
रुग्णसेवा हे प्रथम कर्तव्य मानून अथक परिश्रम करणे हे डॉक्टरांसाठी काही नवीन नाही. या वैश्विक महामारीच्या निमित्ताने ही समर्पण वृत्ती सर्व जगासमोर आली आणि त्याचे महत्त्व सर्वांना पटले. डॉक्टर दिनाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, की कठीण काळात केलेल्या ह्या सर्वोत्तम कामगिरीची समाजाने नेहमीच जाणीव  ठेवावी  –  डॅा.अमित पारसनीस (कर्करोग शल्यविशारद)
प्रकृती तितक्या व्यक्ती शिकवणारा वैद्यकीय व्यवसाय, रोगनिदानाचे शास्त्र आणि उपचाराची कला जपणारा. वैद्यकीय शास्त्र तसं applied science, applicator dependandat. सारखा होणार बदल हा ह्या शास्त्राचा चीर स्थायीभाव. हे शास्त्र मानवी आयुष्याची मर्यादा आणि गुणवत्ता ही वाढवणारं. गेल्या तीस पस्तीस वर्षात वैद्यकीय विश्वाने टाकलेली कात, तंत्रज्ञानाच्या जोडीने केलेले सकारात्मक कार्य .कधी रोबोटिक सर्जरी तर गर्भाशय प्रत्यारोपण ह्यासारखे. नाविन्याची कास धरणारे दुसरे शास्त्र बहुतेक नाहीच.’जुने जाऊद्या मरणालागून’ हे केशवसुतांच्या कवितेतील वर्णन सार्थ ठरवणार हा व्यवसाय.
वैद्यकीय व्यावसायिक हा समाज व्यवस्थेचा एक मोठा आधारवड ,शरीराचा चिकित्सक मनाचा संवादक. प्रकृतीतून व्यक्तीला भेटणारा एक वेगळ्या प्रवासाचा साथीदार. इतर समाज हा व्यक्ती वरून प्रकृतीचे अंदाज बांधतो तर वैद्यकीय व्यावसायिक प्रकृतीवरून व्यक्तीचे अनुमान करतो.परत प्रत्येक प्रकृतीचा प्रतिसाद वेगळा रक्तवाढीसाठी दिले गेलेल्या iron च्या गोळीने एकाला constipation होते तर दुसऱ्याला diarrhoea. हेच सूत्र आयुर्वेद  चिकित्सा पद्धतीचे .वात, पित्त, कफ ह्या रोगप्रकृती तर होमिओपॅथी psora, syphillis, psychosis ही temparament मानणारी. modern medicine हे रोगाला केंद्रस्थानी ठेवणारे तर इतर  शास्त्रे रोग्याला. साधने अनेक साध्य एक. पालखी सारखीच ही साधने तुकोबांची काय आणि ज्ञानोबांची काय शेवटी उद्दिष्ट पंढरी आणि विठोबा. तसंच काहीसं आरोग्य पालख्यांचे अंतिम ध्येय आरोग्य पंढरीचे, पालखीचे भोई अनेक पण विठोबा एकच आरोग्य. आज modern medicine ही प्रतिबंधाला महत्व देऊ लागलंय antioxidant, immune modulator ही त्याचीच फळं.
आजपर्यंत वैद्यकीय संशोधनाच्या प्रयत्नांनी गोवर, कांजिण्या, राजयक्षमा (t b)देवी आदी रोगांवर लसीच्या(vaccine)च्या रूपाने मानवजातीचे संरक्षण केले आहे. आज करोनाने विश्व उद्ध्वस्त  केलयं त्यावरही लसीचा उपाय लवकरच सापडावा, सर्वव्यवस्थेला लागलेली खीळ मिटून जावी हीच प्रार्थना जगनियंत्याकडे. तोच तर संशोधनाला बळ देतो.ह्या व्ययसायाचा भाग बनविल्याबद्दल त्याचे आभारही. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि प्रकृती म्हणजे शरीरस्वास्थ्यही, एका निसर्गरूपी प्रकृतीने शरीररूपी प्रकृतीला वैद्यकीय व्यावसायिकाच्या हातातून निरंतर स्वास्थ्याचे अर्घ्य द्यावे आणि त्या स्वास्थ्याने समाजाला साकार रूप यावे ही त्या निर्गुण निराकाराला  विनंती.  – डॉ प्रसाद पिंपळखरे
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा