वॉशिंग्टन, २८ ऑक्टोबर २०२०: दुचाकी मध्ये एक मोठा ब्रँड मानला जाणाऱ्या हार्ले डेविडसननं एक इलेक्ट्रॉनिक बाईक बाजारात आणली आहे. तसं म्हटलं तर याला सायकल म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल कारण याचा लुक देखील सायकल प्रमाणंच आहे. हार्ले डेविडसन आगामी काळात आपल्या ई बाइक च्या डिव्हिजन ला ‘सिरीज वन सायकल’ या नावानं स्थापित करत आहे.
१९०३ मध्ये हार्ले डेव्हिसनच्या सर्वात जुन्या मोटरसायकलचे नाव सिरियल नंबर वन होते. कंपनीनं सीरियल १ सायकलसाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे. सिरीयल वन सायकल यावर आधारितच या नवीन सायकलचे नाव ठेवण्यात आलं आहे जे सिरीज वन असं आहे. या बाईकची विक्री पुढील वर्षी मार्च महिन्यामध्ये सुरू होणार आहे. असं असलं तरी सध्या कंपनीनं या बाईक विषयी कोणतीही माहिती किंवा वैशिष्ट्ये जाहीर केलेले नाहीत.
सिरीयल वन मध्ये पांढऱ्या रंगाचे टायर देण्यात आले आहेत. आपल्या नेहमीच्या वापरातील सायकल प्रमाणं याला एक्सिट देण्यात आलं आहे तसेच नेहमीच्या सायकलमध्ये ज्याप्रमाणे चैन असते त्याचप्रमाणं या सायकल मध्ये देखील चैन आणि पेंडल देण्यात आली आहे. कंपनीनं सिरीयल वन सायकल साठी एक स्वतंत्र वेबसाईट देखील तयार केली आहे.
हार्ले डेव्हिडसन सीरियल वन सायकल वेबसाइटवर १६ नोव्हेंबर पर्यंत काउंटडाउन टाइमर आहे. म्हणजेच, कंपनी १६ नोव्हेंबर रोजी त्याबद्दल अधिक माहिती सामायिक करू शकते. हार्ले डेव्हिडसनच्या म्हणण्यानुसार, सीरियल वन ई बाइसिकल दूरच्या प्रवासासाठी तसेच वेगवान आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतीही शारीरिक कसरत न करता प्रवासाचा आनंद देईल, जो शहरी प्रवासासाठी सर्वोत्तम उपाय असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे