गोल पोस्ट गुन्हा गर्लफ्रेंड ला खुश ठेवण्यासाठी चक्क तो क्राईम करू लागला……

गर्लफ्रेंड ला खुश ठेवण्यासाठी चक्क तो क्राईम करू लागला……

मुंबई, १७ डिसेंबर २०२०: हल्लीची तरूण पिढी कधी प्रेमात पडल्यानंतर कधी काय करेल याचा नेम नाही. पण, देशात नेहमीच प्रेम या विषयावर एक ना अनेक घटना कुठल्या ना कुठल्या शहरात घडत असतात. पण, याचे परिणाम देखील तसेच भोगावे लागतात. अशीच एक प्रेमात घटना घडली आहे. जिथं गर्लफ्रेंड ला खुश ठेवण्यासाठी चक्क बाॅयफ्रेंड क्राईम करू लागला.

क्राईम करणारा साधासुधा व्यक्ती नसून बाॅलिवूड मधला लेखक आहे. आपल्या गर्लफ्रेंड ला खुश ठेवण्यासाठी त्यानं आनोख्या क्लृप्त्या लढवल्या आणि आनेकांना लाखोंचा गंडा घातला. आरोपी बाॅलिवूड मधील पटकथा लेखक आसून शुभम पीताबंर साहू आसं त्याचं नाव आहे. तर तो २८ वर्षीय लेखक आहे.

शुभम हा लेखक म्हणून चांगली कमाई करत होता. पण, कोरोना आला आणि एकाकी झालेल्या लाॅकडाऊन मुळं तो स्वताच आर्थिक संकटात सापडला. त्याला काय करायचं हे सुचत नव्हतं आणि त्यात त्याच्या गर्लफ्रेंड ची काळजी त्याला सतावू लागली आणि त्यानं असं कृत्य केलं.

आपल्या युट्युबर गर्लफ्रेंड ला आर्थिक चणचण भासू नये म्हणून त्यानं सायबर फ्राॅड केला. ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहू एका मुलीच्या प्रेमात पडला. ही मुलगी युट्युबर आहे. आपण सामोरे जात असणार्या आर्थिक आडचणी बाबत प्रियसीला माहिती मिळू नये म्हणून त्यानं लोकांची फसवणूक केली आणि याच फसवणुकीतून आलेल्या पैशातून त्यानं गर्लफ्रेंडला सोन्याची बांगडी भेट दिली. इतक्यावरच न थांबता त्यानं तिला पिकनिक ला जयपूर ला घेऊन जाण्यासाठी तयारी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version