गोल पोस्ट आरोग्य आरोग्यमंत्र ‘आलू बुखारा’! मधुमेह, पचन आणि हृदयासाठी वरदान; मात्र, अतिसेवन ठरू शकते...

आरोग्यमंत्र ‘आलू बुखारा’! मधुमेह, पचन आणि हृदयासाठी वरदान; मात्र, अतिसेवन ठरू शकते हानिकारक!

Health Benefits of Prunes Good for Diabetes, Digestion & Heart, But Overeating Can Harm
मधुमेह, पचन आणि हृदयासाठी वरदान;

Health Benefits of Prunes [Aloo Bukhara]: आहारात फळांचे महत्त्व अनमोल आहे, आणि याच महत्त्वकांक्षी फळांपैकी एक म्हणजे आलू बुखारा! चवीला आंबट-गोड आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असलेले हे पौष्टिक फळ सध्या बाजारात चर्चेचा विषय बनले आहे.

आलू बुखारा हे जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. याचे नियमित सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय व डोळ्यांचे आरोग्य राखले जाते. विशेष म्हणजे, हे फळ वजन आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. यात असलेले पॉलीफेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करण्यासही उपयुक्त ठरतात, असे आहार तज्ज्ञ डॉ. तनप्रीत कौर मेहता यांनी सांगितले. त्या म्हणतात, “आलू बुखारा हे फळ अनेक जीवनसत्त्वयुक्त व अँटिऑक्सिडंटने परिपूर्ण आहे. तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत करते. त्याच्या सेवनाने अनेक लाभ होतात.”

बाजारात आलू बुखाराचा भाव सध्या अंदाजे १५० ते २५० रुपये प्रति किलो आहे. फळाची गुणवत्ता, आकार आणि उपलब्धतेनुसार हा भाव बदलू शकतो. आगामी सण-उत्सवांमध्ये मागणी वाढल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि नागालँड या थंड हवामानाच्या राज्यांमध्ये आलू बुखाराची लागवड केली जाते. जगातील सर्वात मोठा आलू बुखारा उत्पादक देश चीन आहे, जो जागतिक उत्पादनाचा अर्ध्याहून अधिक वाटा उचलतो. त्यामुळे बाजारात दिसणारे आलू बुखारा आपल्या देशातून तसेच चीन किंवा इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आयात केलेले असू शकते.

महत्त्वाची सूचना: इतर फळांप्रमाणेच आलू बुखाराचे अतिसेवन केल्यास दुष्परिणाम संभवतात. यामुळे पचन बिघडणे, रक्तातील साखर वाढणे आणि मूत्रपिंडात खडे तयार होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे या फळाचे सेवन प्रमाणित प्रमाणातच करणे आवश्यक आहे. आरोग्यदायी लाभांसाठी आलू बुखारा आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा, पण प्रमाणात!

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version