आनंद मोहन यांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी

नवी दिल्ली, १ मे २०२३: बिहारचे माजी खासदार आनंद मोहन यांच्या सुटकेला आव्हान देत तत्कालीन जिल्हाधिकारी जी. कृष्णैय यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या ८ मे रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज स्पष्ट केले आहे.

कृष्णैया यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेले आनंद मोहन यांची अलिकडेच बिहार सरकारच्या निर्णयानंतर सुटका करण्यात आली होती. मोहन यांच्या निर्देशावरुन कृष्णैया यांची हत्या झाल्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला होता. त्यानंतर मोहन हे शिक्षाही भोगत होते. तथापि बिहार सरकारने कायद्यात बदल करत मोहन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. बिहारमधील नितीश कुमार सरकारवर यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

१९९४ साली कृष्णैया यांची जमावाकडून निर्घूण हत्या झाली होती. आनंद मोहन यांना पुन्हा अटक केली जावी, तसेच बिहार सरकारने मोहन यांच्या सुटकेसाठी कायद्यात जो बदल केला आहे. त्याला स्थगिती द्यावी, असे उमा कृष्णैया यांनी याचिकेत म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा