नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२१: देशात कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढलाय. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र प्रयत्न करत आहे.तसे केंद्र सरकार वर अनेक स्तरांवर कोरोना बाबतीत अपयशी झाल्याची टीका होत आहे.या सर्वात एम्स आणि ICMR ने वयोवृद्ध रूग्णांसाठी काही गाईडलाईन्स जाहीर केल्यात.
कोरोना संसर्ग झालेल्या ज्या वयस्कर रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही, त्यांना सौम्य संसर्गात धरलं जाईल.
ज्या जेष्ठ रूग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खोलीमध्ये आसताना ९० ते ९३ टक्यांच्या मध्ये आसेल त्यांना माॅडरेट म्हणजे मध्यम स्वरूपात धरलं जाईल.
ज्या रूग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खोलीमध्ये आसताना ९० टक्यांपेक्षा कमी आहे त्यांना गंभीर संसर्ग आसल्याचं मानलं जाईल.
मध्यम संसर्ग असणाऱ्या रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या वाॅर्ड मध्ये दाखल करण्यात आलंय. या रूग्णांची तब्येत गंभीर झाल्यास छातीचा सिटी स्कॅन आणि एक्सरे काढण्याचा सल्ला दिला आहे.
गंभीर संसर्ग आसलेल्या रूग्णांना ICU वाॅर्डात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या परिस्थिती नुसार त्यांना रेपस्टिपेटरी सपोर्ट देण्यात यावा असं सांगण्यात आलंय.
रेमडेसिवीरचा वापर ऑक्सिजन सपोर्टची गरज नसलेल्या,फक्त मध्यम आणि गंभीर श्रेणीतील रूग्णांसाठी करण्यात यावा,अ सं गाईडलाईन्स मध्ये सांगण्यात आलंय.
होम आयसोलेशन मध्ये आसणार्या आणि ऑक्सिजन ची गरज न भासणार्यांना रेमडेसिवीर देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलंय.
ICU मध्ये दाखल होऊन २४ ते ४८ तास उलटलेल्या गंभीर रूग्णांना आणि ज्यांची परिस्थिती बिघडत चाललीय अशांना टाॅसिलिझुमॅब देण्याचा सल्ला देण्यात आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव