उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा अचानक राजीनामा, विधी वर्तुळात खळबळ

नागपूर, ४ ऑगस्ट २०२३ : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी आज अचानक राजीनामा दिल्याने विधी वर्तुळात खळबळ माजली आहे. न्या.देव यांनी न्यायालयात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करीत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मनाविरुद्ध झालेल्या बदलीसह अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करताना न्या.देव यांनी सर्व उपस्थिंतापूढे दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले. माझा कोणावरही राग नसून माझ्यामुळे कोणी दुखावले गेल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे न्या. देव यांनी डायस सोडण्यापूर्वी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी वकीलांवर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जातय.

नेमक्या कोणत्या कारणापायी व्यथित होऊन न्यायमूर्ती देव यांनी राजीनामा दिला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधी वर्तुळात मात्र या राजीनाम्याने खळबळ निर्माण झाली आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी न्या.देव हे राज्याचे महाधिवक्ता होते. ते डिसेंबर २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा