आदिवासी महिला आता ‘स्वयंपूर्णा’! ‘राणी दुर्गावती’ योजनेतून ७.५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ‘ती’ आता आपल्या पायावर उभी राहणार आहे! महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी या योजनेंतर्गत व्यक्तिगत लाभासाठी ५० हजार रुपयांपर्यंत १००% अर्थसाहाय्य मिळेल.

तर सामूहिक गटासाठी ही मर्यादा ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत असेल. शेळी-मेंढी वाटप, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि कृषी सिंचन यांसारख्या विविध योजनांसाठी पूरक मदत मिळणार आहे. अनुसूचित जमातीतील महिलांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आशा कांबळे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले