हिंदी चित्रपटसृष्टीचे “शोमॅन” प्रवास : राज कपूर

हिंदी सिनेमाचे ‘शोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. राज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळया उंचीवर नेण्याचे काम केले. याशिवाय चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार घडविण्याचे काम त्यांनी केले. आज जाणून घेऊ या त्यांच्याविषयी

राज कपूर यांचे पूर्ण नाव ‘रणबीर राज कपूर’ असे होते. ‘रणबीर’ हे आता त्यांचा नातवाचे म्हणजेच ऋषि – नितू कपूर यांच्या मुलाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या १० वर्षात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. राज कपूर यांनी ‘रंजीत मुव्हीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ फिल्म प्रॉडक्शनमध्ये ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली
‘इन्कलाब’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होते.
१९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नीलकमल’ या सिनेमामुळे ते सिनेसृष्टीत प्रसिद्धी झोतात आले होते. पुढे राज कपूर यांनी १९४८ साली आर.के.फिल्म्स स्टुडिओची स्थापना केली बरसात हा अटकेची निर्मिती असलेला पहिला सिनेमा ठरला.
बरसात सिनेमातील नर्गिस आणि राज कपूर यांनी हातात पकडलेली व्हायोलिनचा सिन आपण सर्वानी पहिलाच असेल पुढे जाऊन हेच दृश्य आरके फिल्म्सचा लोगो ठरला.
राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. हा सिनेमा तब्बल ४ तास ३० मिनिटाचा होता दोन मध्यंतर असलेला हा हिंदीतील पहिला चित्रपट ठरला ‘आग’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७१ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
१९८७ साली त्यांना हिंदी सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.

मेरा नाम जोकर’, ‘श्री ४२०’,’आवारा’, ‘बेवफा’, ‘आशियाना’, ‘अंर’, ‘अनहोनी’, ‘पापी’, ‘आह’, ‘धुन’, ‘बूट पॉलिश’ इत्यादीचा समावेश होतो.
बॉलिवूड क्षेत्राला एका उंचीवर नेवून ठेवणाऱ्या या महान कलाकाराला विनम्र अभिवादन.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा