पोलिस अधीक्षकांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी केला सन्मान

11

बारामती, ११ जानेवारी २०२१: बारामती शहरातील सावकारी मोडून काढण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बारामती शहर पोलिस अधिकारी व कर्णाचारी यांना दहा हजार रुपये व पारितोषिक सन्मानपत्र देण्यात आले.

काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, अश्विनी शेंडगे, पोलिस कर्मचारी अनिल सातपुते, तात्यासाहेब खाडे, रामदास जाधव, दादासाहेब डोईफोडे, अतुल जाधव यांना पोलिस अधीक्षकांनी सन्मानित केले.

बारामतीत सावकारांच्या झालेला सुळसुळाट नागरिकांना व्याजासाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सावकारांवर कारवाई करत पोलिसांनी पिचलेल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.तसेच शहरातील अनेक अवैद्य व्यवसायावर टाच आणल्याने या कामगिरीची दखल पोलिस अधीक्षकांनी घेत कर्मचाऱ्यांना पुण्यात झालेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव